प्रतिनिधी:- कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये वनशेती मधील महोगनी वृक्ष लागवड बाबत राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महोगनी विश्व अॅग्रो प्रा. लि. पुणे व अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित केव्हीके बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील ९० प्रतिनिधी हजर झाले आहेत. कंपनी चे संचालक श्री गणेश हराळ यांनी प्रस्ताविकामध्ये महोगनी वृक्ष निचरा होणारी जमीन व दुष्काळ ग्रस्थ भागासाठी वरदान ठरत आहे. महोगनी वृक्ष पानाचा उपयोग डासरोधक उत्पादन बनविणे , फळामधील बियाचा उपयोग मधुमेह, कॅनसर, मलेरिया, अनेमिया, डायरिया या सारख्या आजारामध्ये वैद्यकिय कारणासाठी व औषधामध्ये केला जात आहे . याचे लाकूड लाल गडद लालसर गुलाबी रंगाचे उच्च घनता असलेले असते . लाकडचा उपयोग संगीत वाद्य, खेळणी ,घरातील फर्निचर व तसेच जहाज बांधणी साठी केला जातो हे लाकूड १०० वर्ष दीर्घकालीन टिकते या लाकडाला मार्केट मध्ये मागणी जास्त आहे आसे ते म्हणाले.
कंपनी चे संस्थापक श्री भगतशिंग शेळके म्हणाले महोगनी वृक्ष रोपणामुळे पर्यावरणाचा समतोल ठेवता येतो त्या मुळे कार्बोन क्रेडीट चा लाभ घेता येतो. या झाडाची लागवड १०x१० फुटावर केली जाते प्रति एकरी ४४४ रोपे लागतात . सदर लागवडीसाठी पंचायत समिती व सामाजिक वन विभाग अंतर्गत प्रति एकर रुपये २,५१,७४८/- अनुदानाचा लाभ तीन वर्षपर्यंत टप्या टप्याने जॉबकार्ड धारक शेतकर्यांना घेता येतो .
डॉ . मिलिंद जोशी विषय विशेषज्ञ के व्ही के यांनी कीड व रोग व्यवास्थापन विषयी मार्गदर्शन केले. श्री हनुमंत शेंडगे यांनी माती परीक्षण व खत व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री संतोष गोडसे विषय विशेषज्ञ यांनी के व्ही के ची माहिती दिली व फार्म ची शिवार फेरी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *