बारामती दि. 27 :- बारामती नगरपरिषदेने घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भाडे वसुलीची तीव्र मोहिम सुरू केली आहे. नगरपरिषदेमार्फत शहरात नागरिकांच्या सोयी – सुविधांसाठी विविध विकास प्रकल्प राबविताना करांची वसुली प्रभावीपणे होणे आवश्यक आहे, त्यासाठी मिळकतधारकांनी मुदतीत कर भरणे अपेक्षित आहे. नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारक व नळग्राहक यांना त्यांचे कडील मार्च 2022 पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची मागणी बिले अलहिदा स्वतंत्रपणे देणेत येत आहेत. ज्या थकबाकीदारांकडून रक्कम येणेबाकी आहे त्या थकबाकी रक्कमेवर कायद्यातील तरतूदीनुसार बिलात नमूद केल्याप्रमाणे दरमहा दोन टक्के शास्तीची रक्कम भरावी लागणार आहे.थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यास पाणी कनेक्शन बंद करणे, मालमत्ता अटकावून ठेवणे अगर वॉरंट काढून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

तथापि ज्या थकबाकीदार मिळकत धारकांनी अद्यापही घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची रक्कम नगरपरिषद कार्यालयात भरणा केला नाही तर त्यांची नावे दैनिक व साप्ताहिक मध्ये प्रसिध्द करण्यात येतील. मिळकतधारकांना ऑनलाईन घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांचे भरणा करणेसाठी http://www.baramatimuncipalcouncil.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. तरी करांचा भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व विकास कामात आपले बहुमोल योगदान द्यावे व कटू कारवाई टाळावी असे, आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *