बारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) 21 ऑगस्ट रोजी सहारा फाउंडेशन बारामती च्या वतीने गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण महर्षी तथा मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन मा.पि.ए.ईनामदार साहेब उपस्थित होते , त्याच बरोबर पौर्णिमाताई तावरे नगराध्यक्ष बारामती नगरपरिषद, बाळासाहेब जाधव उपनगराध्यक्ष बा न प , सचिन शेठ सातव गटनेते बा न प, हाजी सोहेल खान अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अली असगर इनामदार व्हाईस चेअरमन मुस्लिम बँक, दादासाहेब कांबळे प्रांत अधिकारी बारामती , फकृद्दिन कायमखानी ,अल्ताफ भाई सय्यद संचालक मुस्लिम बँक, कमरुद्दीन सय्यद सभापती शिक्षण मंडळ बा न प , व इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, अध्यक्ष सहारा फाउंडेशन, बारामती यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *