नानासाहेब साळवे

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय बारामती या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक व दृबल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यालयातील कु.सई अरविंद पवार हिने 154 गुण मिळवत पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर कदम स्वानंद किशोर व कळसाईत ओम दत्तात्रय याही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. या तिन्ही विद्यार्थाना इ 9 वी ते 12 वी पर्यंत प्रतिवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे एकूण 48000 हजार रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. केंद्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक दृबल घटकातील इ 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल NMMS विभागप्रमुख श्री सोमनाथ मिंड सर ,सहाय्यक विभाग प्रमुख श्री विकास जाधव सर व सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन स्थानीय स्कूल कंमिटी सदस्य श्री सदाशिव(बापू) सातव , विद्यालयाचे प्रा.श्री राजेंद्र काकडे, उपमुख्याध्यापक श्री देवडे सर, पर्यवेक्षक श्री जाधव सर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद श्री बंडू पवार, आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *