बारामती ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावचे सुपुत्र श्री संपतराव खोमणे हे परिवहन खात्यामध्ये सेवा करत आहेत. सेवा करत असताना त्यांना समाजसेवेची आवड आहे. वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर, रुग्ण सेवा, मदत कार्य हे सदैव त्यांचं चालू असतं. रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अपंग लोकांची सेवा करण्याचं मोठं काम केलं. या कामाची दखल घेऊन रोटरी क्लबने त्यांची हडपसर रोटरीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. खोमणे यांचे कुटुंब शेतकरी कुटुंब असून ते परिवहन खात्यातील सेवे बरोबर राहिलेला वेळ समाजसेवेसाठी देतात. ग्रामीण भागातील सुपुत्राला रोटरीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *