बारामती दि. १४ :भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, डॉ.भक्ती सरोदे-देवकाते, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड, दुय्यय निबंधक अशोक आटोळे, सुरेश जाधव, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

बारामती तालुक्यातील अंत्योदयकार्डधारकांना ५ हजार ३०० राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात अंत्योदयकार्डधारकांना ५ हजार ३०० राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच ध्वजारोहणानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *