प्रतिनिधी – भारत सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये पूर्व निहित संगम फाउंडेशन सहभागी होऊन या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रामधील विविध शाळांमध्ये मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप केले. हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यामध्ये संस्थेचे चेअरमन नितीन आटोळे, संचालक श्री नितीन चालक, खजिनदार श्री दत्तात्रेय शिंदे, श्री गणेश जगदाळे, योगेश सस्ते, प्रदीप लोणकर, मधुकर गाढवे, सागर पार्लेकर, अजय नाझीरकर, एडवोकेट हमाडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
तसेच या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तिरंगा वाटप करण्यात आलेली ठिकाणे, शाळा व नावे 1. न्यू इंग्लिश स्कूल मेखळी तालुका बारामती जिल्हा पुणे, 2. श्री नागेश्वर विद्यालय नाझरे क प तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 3. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरे क प, 4. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरे सुपे, 5. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 6. विश्वासराव रणसिंग महाविद्यालय वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, 7. जिल्हा प्राथमिक शाळा मळद तालुका बारामती जिल्हा पुणे, 8. न्यू इंग्लिश स्कूल लाकडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, 9. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मूर्ती बारामती जिल्हा पुणे, 10. न्यू भैरवनाथ विद्यालय काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे, 11. श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे, 12. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ननवरे मळा जाचक वस्ती इंदापूर पुणे, 13. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 दोरगेवाडी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे, 14. ग्रामपंचायत कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे, 15. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी ता बारामती पुणे, 16. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती पुणे, 17. वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन बारामती पुणे, 18. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणच्या शाळांमध्ये मोफत तिरंगा वाटप करण्यात आले. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत या अमृत महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पूर्व निहित संगम फाउंडेशन यांनी मोफत तिरंगा वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *