प्रतिनिधी (गणेश तावरे ) देऊळगाव रसाळ येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. अजित पवार यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस मा. हाजी रमजानभाई इनामदार ( बडेभाई इनामदार ) यांनी वह्यांचे वाटप केले.

देऊळगाव रसाळ येथील वसंतराव पवार विद्यालय , जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देऊळगाव रसाळ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रसाळवाडी नंबर १ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रसाळवाडी नंबर २ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनापिरवाडी , न्यू इंग्लिश स्कूल कारखेल , न्यू इंग्लिश स्कुल नारोळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरोळी या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थीना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित बारामती पंचायत समितीचे मा. सभापती पोपट काका पानसरे , बारामती तालुका खरेदीविक्री संघाचे मा. चेअरमन मा. श्री. अंकुश रसाळ , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा. हाजी रमजानभाई इनामदार ( बडेभाई इनामदार ) , वसंतराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. विलास तावरे, देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. दत्तात्रय वाबळे , सदस्य – सल्लाउद्दीन इनामदार , आनंद रसाळ , बजरंग इनामदार , संतोष रसाळ , जावेद इनामदार वआदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *