बारामती दि.३१: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा निमित्त आज बारामती शहरातील आमराई येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.सुहास नगर येथील युवकांनी मिळून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.आज सकाळी बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे यांच्या शुभहस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी नगरसेवक बिरजू मांढरे,ॲड.सुशिल अहिवळे,सुनिल शिंदे,शुभम अहिवळे आणि आदी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला असून.तब्बल ५१ युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.या युवकांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.मात्र रक्तदान शिबिराचे हे पहिले वर्ष असल्याने पुढच्या वर्षी या पेक्षा अधिक उत्साहाने आणि जोमाने रक्तदान शिबीर पार पडू असे यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले.

दरम्यान,रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मनोज शिंदे,अक्षय पोळ,प्रफुल्ल राठोड,नागेश कांबळे,रुपेश रणशिंग,गोरख लोंढे,प्रकाश सोनवणे,बंटी जगताप,अभिजित गोरे,राजपाल गायकवाड,सागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *