बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी

माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तेथे होणाऱ्या चोऱ्यांना नुकताच बारामती तालुका पोलिसांनी आळा घातला आहे, दिनांक 29/ 7 /2022 रोजी एक व्यक्ती दोन गावठी बनावटी पिस्टल व एक रिवाल्वर तसेच जिवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन आला असले बाबत बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांना गोपनीय माहिती मिळाली . पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असलेले तपास पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक अमोल नरुटे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने यांना सदर व्यक्तीस पकडून खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले . तपास पथक सदर इसमास पकडण्यासाठी गेले असता पोलिसांची चाहूल लागल्याने तो इसम सैरावैरा पळू लागला त्यास मोठ्या शीताफिने तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्टल एक रिवाल्वर व तीन जिवंत काडतुस मिळून आले .तो विनापरवाना जवळ बाळगून विक्री करणार होता. त्याच्याकडे अग्निशस्त्र व जिवंत काडतुस आहेत हे माहीत असताना देखील मोठ्या सीताफिने व बेडरपणे त्यास ताब्यात घेऊन तालुका पोलिसांनी आणखी एक दमदार कामगिरी केली आहे. सदर व्यक्तीचे नाव अमित तानाजी शेंडगे वय 20 वर्ष मूळ रा. उस्मानाबाद . सध्या रा. रुई , बारामती आहे. सदर आरोपी याच्यावरती बारामती तालुका पोलीस स्टेशन व बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 394,379 प्रमाणे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते बारामती विभाग पुणे ग्रामीण . उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे बारामती विभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरुटे , सदाशिव बंडगर पो. कॉ. दत्ता मदने यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लेंडवे बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *