प्रतिनिधी – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पुणे बारामती आयोजित भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम काल दिनांक 25 जुलै 2022 रोजी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय बारामती येथे पार पडला. या कार्यक्रमास उपस्थिती भारतीय जनता महिला आघाडीच्या लोकप्रिय जिल्हाध्यक्ष मा.सौ कांचन ताई कुल उपस्थित होत्या.
कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दादा दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अजित मासाळ , बारामती युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम पंत थोरात , भारतीय जनता युवा मोर्चा संघटन सरचिटणीस प्रमोद साबळे, भाजपा युवा वॉरियर्स तालुका अध्यक्ष संदीप केसकर यांनी युवा मोर्चाच्या वतीने घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित मासाळ यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा सौ कांचनताई कुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास 109 बॉटल रक्त, रक्तदात्यांनी दान केले, तसेच या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला व मोठ्या संख्येवर युवक उपस्थित होते. त्यानंतर अतिथींच्या हस्ते भाजपा जनता पार्टी संपर्क कार्यालयाच्या समोर वृक्षारोपण केले. रक्तदान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू होते. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा बारामतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील वाढदिवसाचे निमित्त साधून 501 रक्तदान होईल याचा संकल्प केलेला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जो रक्तदाता आहे त्याला एक झाड भेट देण्यात आलेलं आहे आणि ते झाड तो रक्तदाता सांभाळेल ही सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *