प्रतिनिधी- बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी कोरोना नंतर पहिल्यादाच पालक मेळावा अगदी उत्साहात पार पडला. या पालक सभेसाठी मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती.या सभेत विद्यालयाचे उपशिक्षक श्री विकास जाधव यांनी विद्यालायत राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले,तर श्री दीपक मुळीक यांनी विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध सहशालेय उपक्रमांची माहिती व आरोग्य व आहार या संबंधी मार्गदर्शन केले.विद्यालयातील गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री अरविंद मोहिते यांनी गुरुकुल प्रकल्पाविषयी माहिती दिली. पालकांच्या मनोगतातून श्री अविनाश सावंत व पर्यावरण तज्ञ श्री महेश गायकवाड यांनी विद्यालयातील विविध प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त केले व त्याचबरोबर आरोग्य व पर्यावरण याविषयी मार्गदर्शन केले.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रा.श्री पोपट मोरे यांनी विद्यालयाला पालकांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करत,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,विद्यार्थी ,पालक व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.उर्मिला भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *