प्रतिनिधी – वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।। पक्षी ही सुस्वरें आळविती ।। या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला झाडांचं महत्व सांगत आहेत. गेली 400 ते 350 वर्ष या सर्व संत परंपरेने आपल्या समाजात विविध प्रकारे लोकांमध्ये जनजागृती केली व वृक्षाच महत्त्व सांगितलं आहे. आज पण अशाच सामाजिक जनजागृतीची गरज ओळखून ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब या संस्थेने तीन टप्यात सुमारे 800 दुर्मिळ देशी झाडांची लागवड केली. फक्त लागवडच नाही तर त्याच संगोपन उत्तम रित्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पार पाडत आहे. या 800 झाडांची लागवड करण्यासाठी ठिकाण पण योग्य निवडल असून त्याचा परिणाम खुप चांगल्या प्रकारे होणार आहे कण्हेरी फॉरेस्ट च्या भागात या 800 वृक्षांची लागवड केली आहे त्यात शेंदरी, शिरीष, करवंद, कदंब, वड बदाम, मोहगुण आणि काटीसवाळ अश्या वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष या ठिकाणी ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब या संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आली हि संकल्पना ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हबच्या Curator मा.देवयानी पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या कार्यक्रमासाठी वन विभाचे अधिकारी सौ.शुभांगी लोणकर (वनाधिकारी बारामती विभाग) ,मा.गोलांडे (वनाधिकारी बारामती विभाग) मा.मधुकर आगलावे व आरोग्य विभागाचे अधिकारी पुष्कराज निंबाळकर त्याच प्रमाणे बारामती हब चे सर्व शेपर्स स्नेहा साळुंखे, फातिमा खायमखणी, शंतनू जगताप, शुभम ओसवाल, माऊली खाडे, भारवी मूलमुले, खाडिजा खायमखणी, अनुराधा जरे, अक्षय घोलप, रवी कांबळे, संकेत भोसले, ओंकार कोकरे, हतीम बारामतीवाला व अखिल सुर्यवंशी सर्वांनीच युद्ध पातळीवर काम करत यशस्वीरित्या हि वृक्ष लागवडीची मोहीम पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *