प्रतिनिधी – दिनांक २८ जुन रोजी बारामती नगरी मध्ये जगद्गुरु संत तुकाबोराय महाराज पालखी सोहळ्याबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ( बार्टी) यांच्या वतीने संविधान रथाद्वारे संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिंडी मा.धनंजय मुंडे , राज्यमंत्री,सामाजिक न्याय विभाग व बार्टी चे मा.धम्मज्योती गजभिये यांच्या मुख्य संकल्पनेतून बार्टी उपायुक्त मा.उमेश सोनवणे व व्यवस्थापक मा.नितीन सहारे,सुमेध थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या संविधान दिंडी सोहळा प्रसंगी प्रसिद्ध गायक विष्णु शिंदे, प्रसिद्ध सप्तखंजीरी वादक तुषार सुर्यवंशी यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामधुन संविधान जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी बारामती येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी मा.रोकडे साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,नगरसेवक गणेश सोनवणे,माजी नगरसेवक प्रा रमेश मोरे, प्रशांत सोनवणे, अॅड किशोर मोरे, संजय मोरे, अॅड अजित बनसोडे, अॅड वैभव कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश सोनवणे उपायुक्त तथा प्रभारी निबंधक,बार्टी यांनी मार्गदर्शन केले,तर प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, विजय बेदरकर, बार्टी टीम,प्रा नितीन शिंदे,अंगद शिंदे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *