मेखळी : बारामती तालुक्यातील मेखळी येथील जिल्हा परिषद प्राथ. शाळा बरकडवाडी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ऋषी देवकाते मित्र मंडळ व सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीने 30 विद्यार्थ्यांना शाळेची बॅग,वह्या व इतर शालेय साहित्य बारामतीचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अहिल्यादेवींची शिकवण आहे की समाजउपयोगी उपक्रमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहचणे हि खरी जयंती निमित्त आदरांजली आहे असे मत किरण गुजर यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक ऋतुराज काळे, शुभम ठोंबरे, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक , शिक्षक, सर्व युवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. ऋषि देवकाते मित्र मंडळ च्या वतीने सर्वांचे आभार मान्यत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *