बारामती -: बारामती नगरपालिकेच्या निवडणूकीची लगबग सुरू झालेली असून बारामती मधून जळूची परिसरातील अस्लम शेख हे अपक्ष व स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढवणार अशी सर्वत्र नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी वेळोवेळी नागरिकांना मदत केलेली असून तसेच आज देखील ते मदत करत आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी राजकारण कधीच केले नाही, तसेच रस्त्याचे प्रश्‍न असतो की गोरगरीब जनतेला बँकेचे कर्जाचा त्रास असो त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला असून न्याय मिळवून देण्याचे काम अस्लम शेख हे करत आहे त्यांचे असे म्हणणे आहे मी निवडणुक अपक्ष लढवून माझ्या जळोची तील नागरीकांचे विलंबित राहिलेले प्रश्न मी मार्गी लावण्याचे काम करणार आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

अस्लम शेख यांचा दांडगा जनसंपर्क, मनमिळाऊ स्वभाव व सामाजिक कार्याचा अनुभव पाहता प्रतिस्पर्धी उमेदवारास सहजा सहजी जिंकू न देता ” काटे की टक्कर ” होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *