बारामती दि. १४: बारामती येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी  प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी दिली आहे.

दिनांक २४ व २५ जून रोजी सकाळी ९ वाजता   डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे क्रिकेट स्पर्धा व जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत.

मागील गेल्या दोन वर्षांत विविध शासकीय  आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना संसर्गाच्या उपाय योजना करण्यासाठी सेवा दिलेल्या आहेत. त्यांची शारीरिक  व मानसिक क्षमता सक्षम बनवण्यासाठी, आरोग्याच्या  दृष्टीकोनातून, थकवा व ताण नाहीसा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे.  सर्व शासकीय विभागांनी क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता गणवेशानुसार संघ तयार करून तशी माहिती जिल्हा क्रीडा संकुल समिती, बारामती यांना तात्काळ  कळविण्यात यावी, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *