इंदापूर, प्रतिनिधी:- दरवर्षी पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे ,समस्या व संवर्धनाविषयी जागृतता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. वरकुटे खुर्द गावांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
कृषिदूत यांचा विविध फळ वृक्षांच्या लागवडीचा संकल्प
वरकुटे खुर्द गावामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषिदूत आकाश शेलार , विकास भुई, स्वप्निल ताम्हाणे ,औदुंबर शिंदे, रणजितसिंह भगत, श्रीनिवास चौधरी, विराज मगर तसेच आदर्श शेतकरी व तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमान वाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत वृक्ष संतुलन राखले जावे, पर्यावरण जोपासावे यासाठी संपूर्ण वरकुटे खुर्द गावांमध्ये रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज कृषिदूत यांच्या वतीने वृक्षारोपण ही मोहीम राबवली गेली. तसेच
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कितीतरी लोकांना प्राण गमवावे लागले त्यामुळे सर्वांनी झाडे लावून त्याचे जतन करावे असे कृषिदूत म्हणाले.
गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगात राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरूनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती त्याचा विचार करून संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे आहे.
तसेच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे त्यामुळे येणार्‍या पिढीसाठी आपण निश्चित एक दान देऊ शकतो या भावनेने उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी दूतांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *