प्रतिनिधी – दिपाली शहाणे – दिनाक 05/06/2022 रोजी पर्यावरण दिनानिमित्त युवा चेतना तर्फे प्राणिमात्रा या विषयांमध्ये आगळा वेगळा उपक्रम करणार असल्याचे सांगितले आहे. या मध्ये माळेगाव ,माळेगाव खुर्द , शिवनगर , शारदानगर, पणदरे , कऱ्हावागज, या गावानंमध्ये हा उपक्रम राबवणार आहे .या उपक्रमामध्ये अपघाती मृत्यू झालेले प्राणी, पक्षी, जनावरे यांना उचलून पुरण्याची पूर्ण जबाबदारी युवा चेतना ने घेतली आहे. या बाबत युवा चेतना सामाजिक संस्थाकडून माळेगाव पोलीस स्टेशन यांना माहिती पत्र देण्यात आले. या वेळेस माळेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उपस्थित होते. या वेळेस युवा चेतना चे मनोज पवार, प्रज्ञा काटे, रितिक बिजागरे, सुषमा बनकर, सतीश पवार , वैष्णवी घोरपडे, प्रियंका सासवडे, विशाल लोणकर, आर्यन काटे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *