प्रतिनिधी : दिपक वाबळे – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तसेच उद्योगपती महेश चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. गणेश चांदगुडे यांच्या वतीने सुपे येथील गरीब कुटुंबातील महिलांना साडीवाटप तसेच मिठाई वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला

काही समाज हे अनेक सुविधा पासून वंचित असणार घटक आहे. हीच बाब लक्षात घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. गणेश चांदगुडे यांनी हा उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कोणाचाही वाढदिवस असल्यास कुठेही वेगळ्या पद्धतीने उधळपट्टी न करता समाजातील गोरगरीब लोकांना लागणाऱ्या संसार उपयोगी वस्तू दान करावे असा एक आगळावेगळा संदेश या उपक्रमातुन गणेश चांदगुडे यांनी दिला आहे यावेळी भिमराव जगताप गुरूजी , दंडवाडीचे माजी सरपंच जयसिंग चांदगुडे , सुपे गावचे माजी उपसरपंच शफीक बागवान , नवनाथ चांदगुडे , कल्याण चांदगुडे , शंकर तांबे , राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे महेश चांदगुडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *