प्रतिनिधी – काल बारामतीचे उपविभागीय परिवहन अधिकारी मा. श्री नंदकुमार पाटील तसेच केसकर यांची भेट घेऊन दौंड, इंदापूर, बारामती या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ओव्हरलोडींग गाड्यांच्या वाहतुकीसंदर्भात व ओव्हरलोडींग वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रोहित नाना बनकर , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री योगेश महाडिक, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज भोसले, पुणे जिल्हा सरचिटणीस सिद्धेश गवळी ,पर्यावरण विभाग अध्यक्ष श्री प्रकाश गायकवाड यांनी निवेदन दिले. 15 दिवसांच्या आत जर कडक कायदेशीर कारवाई झाली नाही, ओव्हरलोडिंग वाहतूक सुरूच राहिली तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *