प्रतिनिधी : दिपक वाबळे – सुपे या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर वाबळे यांचे लीला गुलाब हॉस्पिटल या ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

या शिबिराचे आयोजन स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा महाराष्ट्र राज्य व विद्यानंद फाउंडेशन व सुपे परगण्यातील सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे , सहअध्यक्ष शिवश्री अतुल ढम , सुपे फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष गणेश खैरे , नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी वैभव भापकर , शिवतंत्र न्यूज नेटवर्क सुपे परगणा प्रतिनिधी सागर चांदगुडे , सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे , तसेच छत्रपती उदयनराजे भोसले सुपे परगणा संपर्कप्रमुख सुनील राजे भोसले व सामाजिक बहुउद्देशीय संस्था याच्या अध्यक्षा माननीय कामिनीताई ताकवले , दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार जयराम आप्पा कुंभार , श्री लीला गुलाब हॉस्पिटल चे डॉक्टर श्रीप्रसाद वाबळे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष कामिनी ताई ताकवले यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले लाभार्थ्यांना तसेच रक्तदान करणार्‍या रक्त दात्यास एक लाख रुपयाचा अपघाती विमा पाच वर्षासाठी देण्यात आला रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी तर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले रक्तदान शिबिर आयोजित केले म्हणून स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी लीला हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर श्रीप्रसाद गुलाबराव वाबळे यांचे सहकार्य लाभले व प्रत्येक रक्तदात्यांस सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे यांच्यावतीने जगतगुरु तुकाराम महाराजांची गाथा भेट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *