बारामती:- ( प्रतिनिधी गणेश तावरे) – नुकताच झालेल्या ओबीसी आरक्षण मेळाव्यादरम्यान बारामती मध्ये माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आयोजित असताना भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान बारामती शहर सचिव पदी संतोष जाधव यांची माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, जेष्ठ नेते रंजन काका तावरे,जेष्ठ नेते अविनाश मोटे, जिल्हाउपाध्यक्ष गोविंद देवकाते,तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, शहर अध्यक्ष सतीश फाळके,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ऍड माने, युवा शहर अध्यक्ष मलगुंडे सह पदाधिकारी व पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते .

,यावेळी या आयोजित कार्यक्रमात संतोष जाधव यांना बारामती शहर सचिव पदाचे पत्र देण्यात आले तर बारामती शहर सोशल मीडिया सेल चे अध्यक्ष पदी प्रमोद डिंबळे यांना निवडचे पत्र देण्यात आले. या निवडीमुळे सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले असून पक्ष वाढिसाठी काम करणार असून,सर्वसामान्य लोकांचे कामे मार्गी लावणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *