माळेगाव प्रतिनिधी (गणेश तावरे) – पाहुणेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन .2022 ते 2027 या कालावधी साठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये संस्थेचे मार्गदर्शक सतीश तावरे ,ॲड. विजय तावरे ,व जयराम तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ संचालकांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या संचालकांच्या विशेष बैठकी मध्ये चेअरमन पदासाठी सौ विमल तावरे यांचा व व्हा. चेअरमन पदासाठी बाळासो खुडे यांचेच अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस. पी. गोलांडे यांनी जाहीर केले .
या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक ॲड विजय तावरे ,रणजित तावरे , सुरेश खुडे , विष्णुपंत तावरे , उत्तम ढवळे , गणेश तावरे ,किशोर काशीद, सुरेश पडळकर ,महेश खुडे ,सौ .लक्ष्मीबाई गोळे हे उपस्थित होते ., दूध संघाचे संचालक सतीश तावरे संस्थेचे मार्गदर्शक व संचालक ॲड विजय तावरे ,माजी चेअरमन जयराम तावरे , यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या . या वेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती एस. पी . गोलांडे व संस्थेचे सचिव दत्तात्रय खुडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *