प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन पोलीस भरती 2019 अंतर्गत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून 25 युवतींची पोलीस शिपाई या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून भरती झालेल्या 25 पोलीस सावित्रीच्या लेकींचा कौतुक व सन्मान संस्थेच्या विश्वस्त सौ सुनंदा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
मागील 14 वर्षात या भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण केंद्रातून 613 मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलिस मुख्यालयात व पोलीस ठाण्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळ आपली जबाबदारी व कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर, यांच्या मुलींकरता व आर्थिक परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या व उच्च शिक्षण घेता न येणाऱ्या युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या हेतूने ही प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे.

या प्रशिक्षण केंद्रातील युवतींना संस्थेचे चेअरमन मा श्री.राजेंद्र पवार ,विश्वस्त सौ सुनंदा पवार, सीईओ मा.श्री.निलेश नलावडे व समन्वयक श्री.प्रशांत तनपुरे यांचे वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. तसेच श्री.नितिन खारतोडे, श्री.आर.आर.कदम श्री.संतोष लोणकर, श्री.शरद ताटे, सौ.सोनाली काटकर, श्री.चंद्रकांत जराड, सौ.वर्षा देवकाते इत्यादी शिक्षकांनी ट्रेनिंगचे लेखी व मैदानी प्रशिक्षणाचे कामकाज पाहिले तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी या सर्वांकडून संघ भावनेने सहकार्य मिळते यामुळेच असे यश संपादन करता आले , असे मत संस्थेच्या विश्वस्त मा सौ. सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *