प्रतिनिधी – पद्मविभूषण शरद पवार यांना अपेक्षित असलेल्या विचारांचा कार्यकर्ता तयार करून नव्या विचारांनी प्रेरित होऊन काम करणारे कार्यकर्ते तयार होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ही संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे मार्गदर्शनाने मेखळी येथे “एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी शंकरराव भाऊ देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी फादर बॉडी अध्यक्ष पदी तानाजी शंकर देवकाते, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी संदीप अरुण देवकाते, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष पदी प्रथमेश काशीद, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष किशोर देवकाते, यांची सर्वानुमते निवड झाले बद्दल अभिनंदन करण्यात आले.

या वेळी उपस्थित तानाजी नामदेव देवकाते, विठलराव (आण्णा) देवकाते, दिलीप चोपडे, तानाजी देवकाते, नारायण तुपे, रणजित देवकाते, रमेश देवकाते, सचिन देवकाते, हनुमंत देवकाते, मारुती आप्पा देवकाते, एकनाथ चोपडे, बाळासाहेब देवकाते, हरीचंद्र जगदाळे ,राजाराम निकम, ज्ञानदेव देवकाते, युवराज देवकाते, ऋषि देवकाते, किशोर देवकाते, संदीप देवकाते, नाना काशीद, पप्पू बोबाटे, हनुमंत आप्पा देवकाते, किसन चोपडे, बापू चोपडे, लाला गोडसे, नारायण आप्पा देवकाते, शुभम ठोंबरे आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी पक्षवाढीसाठी आणि गावच्या विकासावर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *