माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) पाहुणेवाडी येथील शिवभक्तांनी दि.17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ला याठिकाणी किल्ले स्वच्छता मोहीम करण्यात आली. 19 फेब्रुवारी रोजी only श्री शिवछत्रपती ग्रुप पाहुणेवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली . विशेष म्हणजे या शिवजयंती मध्ये मुले व मुली यांनी महापुरुषांच्या वेशभूषा करून प्रभातफेरी काढून आगळा वेगळा संदेश देण्यात आला , यावेळी शिवपुजन सरपंच भगवान दत्तात्रय तावरे, सहदेव आनंदराव ढवळे, दत्तात्रय दगडोबा खुडे व ग्रुपचे सदस्य बाबाराजे झांबरे यांच्या हस्ते झाले व सुत्रसंचालन जगताप सर यांनी केले, यावेळी मुले व मुली यांनी महापुरुषांचे विचार सादर केले, सर्व शिक्षक स्टाफ यांनी मुलांना फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढविली, यानंतर मुलांना बक्षीस आणि खाऊ वाटप कार्यक्रम झाला ,सर्व पाहुणेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *