प्रतिनिधी : ( दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती ) देऊळगाव रसाळ येथील स्वयंभु हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजीत केले होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये 170 जणांची तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये मोफत आरोग्य तपासणी व रक्ताच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या व यामध्ये जनरल बॉडी चेकअप , शरीरातील रक्ताचे प्रमाण (HB) , पांढऱ्या पेशी , लाल पेशी , प्लेटलेस , किडनी व यकृताच्या परिणामकारक घटकांच्या तपासण्या व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी या सर्व तपासण्या मोफत केल्या. व खोकल्याच्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाला उपस्थित खरेदी विक्री संघाचे संचालक श्री अंकुश रसाळ , दूध संघाचे संचालक श्री सुरेश रसाळ , उपसरपंच श्री दत्तात्रय वाबळे , भगवान रसाळ , रमेश वाबळे , आनंद रसाळ , निलेश तांबे , वसंत वाबळे , सर्जीराव वाबळे , अय्याज इनामदार , संतोष रसाळ , बापु रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *