बारामती दि.१९: कुळवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पाडून उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जातीपुरते मर्यादित नसून त्यांनी अठरापगड जातील एकत्र करून स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,बसपा नेते काळुराम चौधरी,भूषण ढवाण यांनी मनोगत व्यक्त करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते,नगरसेविका अनिता जगताप,आरती शेंडगे,बिरजू मांढरे,गणेश सोनवणे,मराठा सेवा संघाचे दीपक भराटे,विजय खरात,विजय सोनवणे,सवाने गुरुजी, सुरज शिंदे,अभिजित चव्हाण,अप्पा अहिवळे, विश्वास लोंढे, ॲड.अमोल सोनवणे,रमेश साबळे,साधु बल्लाळ,संजय सातव,बबलू जगताप,सागर लोंढे,संजय वाघमारे,धनंजय तेलंगे,सोनू बालगुडे,संतोष जगताप,तानाजी पाथरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,सचिन काकडे,चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे, सोमनाथ रणदिवे,मनोज केंगार,सुशिल भोसले,सचिन जगताप, कृष्णा सोनवणे आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे, सूत्रसंचालन प्रा.रमेश मोरे तर आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *