प्रतिनिधी (गणेश तावरे) – विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार मा युगेंद्र दादा पवार यांनी काल संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यालयामध्ये भेट दिली. यावेळी संघटनेतील सर्व सभासद पत्रकार बांधव उपस्थित होते. संघटनेच्या वतीने युगेंद्र दादा पवार यांचा सत्कार करण्यात आला व संघटनेची दिनदर्शिका भेट देण्यात आली. युगेंद्र दादा पवार यांनी पत्रकार संघटनेच्या सुरू असलेल्या सर्व उपक्रमांबद्दल माहिती घेतली व कौतुकही केले. या दरम्यान बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की भविष्यात पत्रकार बांधवांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, पुढील काळामध्ये बारामतीमध्ये आदरणीय मोठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन देखील घेण्याचा प्रयत्न करूयात, सध्या पत्रकार बांधवांवर समोर येणाऱ्या अडचणींवर लक्ष देऊन याबाबत काम करूयात, असे मत व्यक्त करत सध्या बदलत असलेल्या सोशल मीडियावरील पत्रकारितेचा देखील आढावा घेत त्यांनी पत्रकार बांधवांना सूचना देऊन त्या अमलात आणाव्यात व ही संघटना जिल्ह्यातील सर्वात मोठी संघटना होईल अशी भावना व्यक्त केली. यावेळी पत्रकार संघटनेचे योगेश नालंदे, तानाजी पाथरकर, चेतन शिंदे, मन्सूर शेख, उमेश दुबे, साधू बल्लाळ, संदीप साबळे, संदीप आढाव, तुषार ओहळ, सुरज देवकाते, निलेश जाधव, स्वप्निल कांबळे, नानासाहेब साळवे, सिकंदर शेख, रियाज पठाण व संतोष पुजारी, वैष्णवी शिरसागर, रितेश गायकवाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *