प्रतिनिधी – कल्याणी ग्रुप मुंडवा यांच्या सौजन्याने CSR FUND E-Toilet (एक संच) प्रकल्प जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे मधील मुली व मुले यांच्यासाठी बसविण्यात आला. याचे उद्घाटन कल्याणी टेक्नोफोर्ज लि बारामती चे शिरीषजी देशपांडे (plant Head), संतोषजी देसाई (Plant Head), दत्तात्रयजी खोमणे ( HR Admin), संदीपजी जाधव (HR Admin), राहुलजी सावंत (CSR Fund Manager ) ,मयुरजी जगताप (International business manager) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप, प्रिंसिपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप तसेच सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्हा, प्रिसिंपल योगिता कांबळे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी स्कूलची उभारणी १० मुलांपासून ४५० मुलांपर्यंत कसा प्रवास झाला व कमीत कमी फी मध्ये काटकसर करून चालविलेली आहे ही स्कूलची माहिती दिली, कल्याणी टेक्नोफोर्ज लि बारामती अधिकारी वर्ग यांनी स्कूलची पाहणी करून ग्रामीण भागातील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलचे कौतुक करून अजून भविष्यात भरभरून मदत करु अशी ग्वाही दिली. आभार प्रिसिंपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *