बारामती/(प्रतिनिधी गणेश तावरे)
आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक मजहर एस.खान यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल कॉलेज कारंजा (घा) येथे कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. येथील कराटे प्रशिक्षक पिंटू सावरकर व सहकारी प्रशिक्षक कुणाल दुर्गे यांनी कोविड-19 च्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांना कराटे सरावा पासून वंचित राहू दिले नाही. त्यांचा सराव नियमितपणे वैयक्तिक रित्या सुरूच ठेवला. परीक्षा घेण्याकरिता पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे, सहा प्रशिक्षक शैलेश सर यांना आमंत्रित केले होते.
या परीक्षेमध्ये हर्षल सावरकर याला ब्लॅक बेल्ट प्रधान करण्यात आला. तसेच ब्लू बेल्स साठी झयान शेख, मेघराज धांडे, प्रसाद, व ग्रीन बेल्ट साठी धनश्री,
ऑरेंज बेल्ट अश्विन केजकर उमेश सनी सर, उत्कर्ष बोबडे, हिमांशू महुरे, दक्ष वासूले, येलो बेल्स साठी प्रतीक घागरे, रितिक रेवतकर,प्रणय घागरे, हर्ष तायडे,भूपेंद्र गौरव गौरखेडे, तनुश्री भांगे, पायल मतूरे, ज्ञांवी वासुले या सर्वांना किशोर अखंडे सर प्रीमियम एव्ही प्रा.लि. नॅशनल हेड यांच्या हस्ते बेल्ट वितरण करण्यात आले व आज दिनांक 31 /2/2022 रोजी या बेल्ट परीक्षेचे प्रमाणपत्र कारंजा न्यायालयाच्या न्यायाधीश कु .अंलोने मॅडम यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्तिथी म्हणून लाभलेले मॉडेल हाय स्कूलचे प्राचार्य ढोले सर व उपप्राचार्य टोपले सर उपस्थित होते .याप्रसंगी त्यांनी समोरील परिक्षेकरिता शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *