आशीर्वाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी – दिपक मोरे, देऊळगाव राजे.
गाई ला जर आपण माता म्हणतो तर, मृत्युनंतर तिच्या देहाची विटंबना थांबली पाहिजे त्यासाठी आशीर्वाद मेडिकल यांनी हा विधायक उपक्रम राबविन्याचे ठरवलं आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला उच्च दर्जाचे आणि पवित्र स्थान आहे. गाईला मातेचे स्थान दिले आहे. त्यामुळे पवित्र अशा गोमातेची मृत्युनंतर तिच्या शरीराची इतर जनावरांकडून होणारी विटंबना ही अमानवीय आहे. त्यामुळे आपली संवेदनशीलता आणि नैतिकता जागृत ठेऊन गोमातेचे मृत्युनंतर अंत्यसंस्कार करणे हे देखील आपले कर्तव्यच आहे या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे.
ज्या शेतकरी बांधवाची गाय मरण पावली असेल तिच्या मरणोत्तर अंत्यसंस्कारासाठी गरजू शेतकरी बांधवांसाठी आशीर्वाद मेडिकल ७००/- पर्यंतचा खर्च मदत म्हणून करेल. त्यासाठी मृत गाईचा खड्डयामधील फोटो काढून अंत्यसंस्कारानंतर तो खड्डा बुजवून हार टाकल्याचा फोटो मोबाईल नंबरवर पाठवून द्यावेत त्यानंतर अंत्यस्कारासाठीचा खर्च ७००/- फोन पे ला देण्यात येतील असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ९५९५८९०७२५
सदर उपक्रम हा एक दिशादर्शक असून पुढील काही महिन्यासाठी दौंड, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यामध्ये राबवला जाईल अशी माहिती आशीर्वाद मेडिकल देऊळगाव राजे, दौंड, यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *