प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022, केडगाव चौफुला नजीक श्रीक्षेत्र बोरमलनाथ सभागृहांमध्ये दौंड व शिरूर तालुका वारकरी सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष श्री ह.भ.प. राजाभाऊ चोपदार , राज्य सचिव माधवीताई निगडे , देहू संस्थान चे अकरावे वंशज श्री प्रशांत मोरे , पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष श्री अनंता देशमुख , पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बारवकर आदी मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री ह भ प संजय वाबळे यांना श्री राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते पुणे जिल्हा कार्यकारणी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष श्री कैलास आबा शेलार व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

ह भ प संजय वाबळे यांनी बारामती तालुका वारकरी सेवसंघाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळलेली आहे याचं कामाची पोच पावती म्हणून त्यांची पुणे जिल्हा कार्यकारणीवर निवड करण्यात आली.

तसेच ह भ प संजय वाबळे हे जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे सामाजिक , धार्मिक , कृषि , सहकार , वैद्यकीय क्षेत्रात खुप मोठे काम आहे. त्यांची निवड झाल्यापासून त्यांना बारामती , दौंड , इंदापूर व शिरूर या भागातुन खुप मित्र परिवार व पाहुणे मंडळींकडून अभिनंदनाचे फोन येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *