माळेगाव – ( प्रतिनिधी, गणेश तावरे )

परवा २२ जुलै आदरणीय अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांचा वाढदिवस त्या औचित्याने मानाजीनगर ग्रामविकास मंचाच्या माध्यमातून वृक्षदिंडी काढून २२ झाडांचे रोपण करण्यात आले. या दिंडीमागील मूळ हेतू हाच की , झाडांची महती याबाबत जनजागृती व्हावी . नेहमीप्रमाणेच बालकांचा नि महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग आजही दिसून आला . सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही होणार पण पतका तयार करण्यापासून, रांगोळी नि थेट वृक्षारोपण करणे अगदी मातीचे आळे करण्यापर्यंत महिलांनी मोलाचे कार्य केले. तसेच वृक्षांचे ऋणानुबंध याची जाण ठेवत दिंडी निघण्यापूर्वी सर्व झाडांची मनोभावे पूजा केली.


तत्पूर्वी पणदरे गावातील ग्रामपंचायत सदस्य मनोज अशोकराव जगताप , रोहनभैया गायकवाड , किरणकुमार काळे यांनी मंचास मोठमोठी प्रत्येकी 10-10 झाडे अर्पण केल्याकारणाने मंचाने त्याचे आभार मानले. तसेच त्यांच्या नि गावातील ज्येष्ठ असे केशवनाना जगताप यांच्या हस्ते प्रत्येकी एक एक झाडाचे रोपण केले. तसेच अनावधानाने त्याठिकाणी कन्ट्रॅक्टर प्रमोद जगताप आले असता मंचाच्या कार्यास रक्कम रुपये २००० /- मदत केली नि बच्चेकंपनीसाठी खाऊ वाटप केला . त्यामुळे किलबिलाट अजून वाढला. त्याचप्रमाणे मंचाची ख्याती ऐकून असल्याने पणदरे गावातील शंकर सुतार , पंकज धुमाळ, अविनाश जमदाडे तसेच शिवाजी ढेरे आमचे बंधू यांना मंचाचा हा आगळावेगळा सोहळा पाहण्याचा अनुभवण्याचा मोह आवरता आला नाही. पंचक्रोशीतील समाजसेवकांनी असेच प्रेम दाखविल्यास नि मंचाची अशीच एकी असल्यास गावाचा चेहरामोहरा बदलण्यास फारसा वेळ लागणार नाही हेही नक्कीच. उल्लेखनीय बाब म्हणजे गावातील लोकांची प्रतिक्रिया अशी की लेकरांनो आमच्या दोन पंढरीच्या वाऱ्या चुकल्या खरे , पण एकाच दिंडीत सगळीच कसर निघाली !! ..”” असे म्हणत ग्रामस्थ मंचाचे कार्य पाहून धन्य झाले.. नि त्यांनी मंचाचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *