बारामती ( प्रतिनिधी – गणेश तावरे ) CCA महाराष्ट्र पुणे महानगराच्या वतीने राज्यस्तरीय बैठक अतिशय उत्साहात आणि नियोजनबद्ध संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पुणे कॉचींग क्लासेस असोसिएशन CCA राजकारणी वार्षिक सभा कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रम सोहळयात सौ.अश्विनी दिनेश पालवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सौ.अश्विनी पालवे या संघर्ष करिअर अकॅडेमी खानापूर , पुणे या अकॅडमीच्या संचालिका आहेत. सौ.अश्विनी दिनेश पालवे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कै.यशवंतराव लक्ष्मण चव्हाण शैक्षणिक संस्था पुणे संचलित व आरोही फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा यश बँकिंग & कम्प्युटर क्लासेस धायरी फाटा पुणे याठिकाणी पार पडला. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे DSP न्यूज नेटवर्कचे संपादक पत्रकार श्री. दत्तात्रय फाळके (D.S.P) यांनी DSP न्यूज नेटवर्कच्या वतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळयासाठी CCA राज्य उपाध्यक्ष प्रा.यशराज सर, राज्यउपाध्यक्ष प्रा. बोरसे सर , राज्य संघटक प्रा. प्रशांत ढाकणे सर ,प. महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. आसिफ शेख, प्रा. जंगले सर , सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. भतगुणकी सर , यशराज सर , राज्याध्यक्ष प्रा पि.एम.वाघ, राज्य सरचिटणीस प्रा ज्ञानेश्वर ढाकणे, राज्य उपाध्यक्ष प्रा. संदिप म्हस्के, राज्य कोषाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब मस्के पाटील, राज्य समन्वयक प्रा अजाबराव मनवर, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रा राजेश इप्पर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *