बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके (D.S.P) यांना महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर आयोजित आय.एस.बी.एन नोंदणीकृत , कला , साहित्य, सामाजिक , लोकसंवाद प्रतिमा संमेलन कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात आला. सामाजिक , शैक्षणिक , अध्यात्मिक , सांस्कृतिक , कला , क्रिडा, सहकार , पत्रकारिता , चित्रकार , चित्रपट इत्यादी क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्य कार्यवीरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . श्री. दत्तात्रय फाळके हे ब्रम्हचैतन्य श्रीनिवास क्रिडा, सामाजिक संस्था तडवळे या संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख तसेच भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य खटाव तालुका अध्यक्ष, रयत सामाजिक प्रतिष्ठान सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख , दक्ष पत्रकार संघ खटाव तालुका संघटक, महाराष्ट्र पत्रकार संघ खटाव तालुका अध्यक्ष, माहिती अधिकार, पोलीस मित्र , पत्रकार संरक्षण सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख , अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष , RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन सातारा जिल्हा संघटक या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी या संघटनाच्या, संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सुप्रसिध्द सिनेअभिनेते मा.माधव अभ्यंकर (झी मराठीवरील , मालिका – रात्रीस खेळ चाले , मुख्य भूमिका – अण्णा नाईक ) यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा राजर्षी शाहू स्मारक सभागृह , कोल्हापूर याठिकाणी पार पडला. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या पुरस्कार वितरण सोहळयासाठी सुप्रसिध्द सिनेअभिनेते मा.माधव अभ्यंकर (रात्रीस खेळ चाले या मालिकेतील मुख्य भूमिका अण्णा नाईक) , मा.प्रकाशजी गायकवाड ( समाजसेवक , उदयोजक रायगड ) , मा.निसार सुतार ( मॅनेजिंग डायरेक्टर अलिव्ह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पुणे) , मा.अशोक आखाडे (नृत्य प्रशिक्षक रत्नागिरी ) , मा.विवेकानंद जितकर (सुप्रसिध्द पंचगव्य तज्ञ सांगली ) , प्रा.डॉ.बी.एन खरात ( अध्यक्ष इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर) , सुरज वाघमोडे (RPS प्रेस रिपोर्टर इंटरनॅशनल असोसिएशन सातारा) , शारदा भस्मे मॅडम , श्री.सुरज बाळासो वाघमोडे ( युवा उदयोजक , स्वराज ट्रान्सपोर्ट मालक) , श्री.समाधान वाघमोडे , गणेश फाळके , आदेश खंडझोडे , रोहन चोरमले (बंटी) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *