दिनांक १६/७/२०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास गणेश फ्लॉवर मर्चंट समोर, निरा ता.पुरंदर जि.पुणे येथे कोर्ट कामकाजासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून गणेश विठ्ठल रासकर रा.निरा ता.पुरंधर जि.पुणे याचेवर रिव्हॉल्वरने गोळीबार करून त्याचा खून केलेबाबत जेजूरी पो.स्टे. ला गु.र.नं. १७३/२०२१ भादंवि क.३०२ आर्म ॲक्ट कलम ३,२५,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयामध्ये आरोपी नामे १.निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे रा.पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा व २.गौरव जगन्नाथ लकडे रा.मिरेवाडी ता.खंडाळा जि.सातारा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी आरोपी नामे निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे यास जेजुरी पोलीस स्टेशन कडून अटक करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.पोलीस अधीक्षक सो.यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते.
गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी नामे संकेत उर्फ गोटया सुरेश कदम वय २५ वर्षे रा.लोणी ता.खंडाळा जि.सातारा हा सुद्धा सामील असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्याचा शोध घेवून त्यास शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा येथून ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी त्यास जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,  

सपोनि. सचिन काळे,
स.फौ. चंद्रकांत झेंडे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,
पोहवा. सुभाष राऊत,
पोहवा. गुरु गायकवाड,
पो.ना. अभिजित एकाशिंगे,
पोकॉ. अक्षय जावळे
यांनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *