पुणे दि. २ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील युवक-युवतीना आणि शेतकऱ्यांना ‘रेशीम व मशरूम उत्पादन व्यवस्थापन कौशल्ये’ याबाबत उद्योजकता जाणिव, प्रेरणा व व्यवसाय मार्गदर्शन होण्यासाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रम आयुक्तालयाच्या https://www.facebook.com/MaharashtraSDEED पा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय कृषि महाविद्यालय, बदनापुर जालना येथील सहायक प्राध्यापिका अस्मिता सुरडकर आणि शासकीय कृषि महाविद्यालय, लातुर येथील सहायक प्राध्यापिका सुनिता मगर मार्गदर्शन करणार आहेत.

“चला उद्योजक होऊ या” या नाविन्यपूर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत याच फेसबुक पेजवर विनामुल्य ऑनलाईन उद्योजकता मार्गदर्शन वेबिनार शृंखला सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी उमेदवारांना फेसबूक पेजवर कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारता येणार आहेत तसेच उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येणार आहेत.

युवक-युवती आणि शेतकरी, रेशीम व मशरूम व्यवसायीक यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या दुरध्वनी क्रमांकावर तसेच punerojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *