प्रतिनिधी (गणेश तावरे ) – जयराम स्वामी विद्या मंदिर जुनियर कॉलेज वडगाव या विद्यालयाचे एस् एस् सी बॅच 1993 चे विद्यार्थी श्री. प्रल्हाद चव्हाण यांची RPS International Press Reporter Association च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मा.श्री संजय पिसाळ, मा. श्री गाडगे, मा. श्री जे. बी. घार्गे, मा. श्री काळे तसेच इतर मान्यवर गुरुजवर्ग यांनी कौतुक करत सत्कार केला. आपण सर्व विध्यार्थ्यांसाठी आदर्श घालून दिलात. एका छोट्याशा गावातील विध्यार्थी अशा आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर विराजमान होतो हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले. मा. श्री प्रल्हाद चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाजातील गोरगरीब लोकांसाठी अनाथश्रम, व्रद्धाश्रम, गोशाळा आणि आपल्या NGO मध्ये आपल्या या सर्वांसाठी व सभासद आणि प्रतिनिधीसाठी वैद्यकीय सेवा उभे करण्याचा मानस व्यक्त केला. RPS International Press Reporter Association च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व शिक्षक गुरुजणांनी त्यांचा शाल आणि स्त्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *