( प्रतिनिधी : दिपक वाबळे ) देऊळगाव रसाळ , बारामती
सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021

करप्शन कंट्रोल कमिटी दिल्ली , चंदुकाका सराफ ट्रस्ट बारामती व दोशी दिपेश अँड रुपेश स्मृती ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने 100 कोरोना योध्दाचा जाहीर सत्कार बारामती येथे करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित श्री. किशोर शहा , डॉ. रमेश भोईटे , डॉ. सदानंद काळे , डॉ. शेवंतीलाल दोशी , श्री. उमेश तांदळे , डॉ. कुंभार , श्री. दिलीप ढवान आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी बारामती नगरपालिका कर्मचारी , उपजिल्हा रुग्णालय सिल्व्हर जुबाली हॉस्पिटल , भोईटे हॉस्पिटल , बारामती हॉस्पिटल , येथील कर्मचारी व सामाजिक संस्था आणि आरोग्य मित्र यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक डॉ. शेवंतीलाल दोशी यांनी केले , डॉ. रमेश भोईटे व डॉ. सदानंद काळे व चांदुकाका सराफ ग्रुप चे चेअरमन श्री. किशोर शहा यांनी मार्गदर्शन केले आणी श्री. अनिल सावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *