माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. कांतीलालजी उमाप सो, मा. संचालक श्रीमती उषा वर्मा मॅडम यांच्या आदेशान्वये व मा.विभागीय उप आयुक्त श्री. प्रसाद सुर्वे सो तसेच मा.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री.संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,विभागीय भरारी पथक,पुणे विभाग,पुणे यांच्या पथकाने दिनांक 14/11/2021 रोजी मोरगावचे हददीत, कऱ्हा नदी पुलाजवळ, हॉटेल तुळजाभवानी समोर ता.बारामती जि.पुणे या ठिकाणी टाटा कंपनीची 12 चाकी वाहन क्र.MH18BG7249 थांबवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता सदरच्या वाहनामध्ये ओरगोनिक कंपोस्ट खत असल्याचे सांगून त्याने त्या पद्धत्तीची बिलटी दाखवली परंतु खब-याने दिलेल्या अचूक माहिती नुसार गाडीमध्ये मद्यच असल्याचे संशयावरुन सदर वाहन तपासले असता वाहनाचे मागील बाजूस प्रथम दर्शी ऑरगॅनिक कंपोस्ट खताच्या गोण्या दिसून आल्या, त्या उग्र वासाच्या जवळपास 55 गोण्या काढल्यानंतर खालील बाजूस गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्लू व्हिस्की 750मि.ली. क्षमतेच्या 1000 बॉक्स मिळून आले. तसेच सदर वाहण्यासाठी पायलाटिंग साठी असणारी महिंद्रा कंपनीची XUV 300 हेही वाहन जप्त करून एकुण अंदाजे किंमत रु. 93,26,200 /- इतक्या किंमतीचा मुददेमाल गुन्हा रजि.क्र. 430/2021 मध्ये जप्त करण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये 1) सलीम खान रा.निमराणी (MP)2) परशुराम साठे रा.महेश्वर (MP) 3) किशोर पाटील रा धुळे, 4) संचय जैन रा. डेललिया (MP) 5) राजेंद्र जयस्वाल रा.महेश्वर (MP) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65अ,ई, 81,83,90,103 व 108 तसेच भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 420, 465, 468 व 471 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक श्री.दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक सर्वश्री. एस.एन.इंगळे, संजय बोधे,शहाजी गायकवाड, संतोष गोंदकर (USL, बारामती) जवान स्टाफ श्री. प्रताप कदम, अमर कांबळे,अहमद शेख, भरत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *