प्रतिनिधी – दिनांक 4 नोव्हेंबर रोजी देसाई ईस्टेट मधील नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर चे कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असा साजरा केला.।
सविस्तर बातमी अशी की अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विशाल जाधव नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रमांमुळे चर्चेत असतात, ते राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून त्यांचा वाढदिवस असाच लोकोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचे ठरवले व देसाई इस्टेट परिसरात वृक्षारोपण व श्रमदानातून स्वच्छता व नगरपालिका महिला कर्मचारी यांना साड्या व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोकडे व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड, शेतकरी योध्दा संपादक योगेश नालंदे, गंभीरे सर, मधुकर काळे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, उद्योजक सतीश अण्णा कोडलिंगे, सिनरमास कंपनीचे अधिकारी कदम सरकार व देसाई इस्टेट परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल जाधव म्हणाले की अजितदादा पवार यांना आवडेल असे सामाजिक कार्यक्रम देसाई इस्टेट परिसरात नेहमीच आम्ही घेत आलो आहोत. माझा वाढदिवस देखील एका सामाजिक उपक्रमाने परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून आयोजित केला याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो व आपल्याला अजितदादांना अभिप्रेत अस स्वच्छ व सुंदर शहर घडवायचे आहे त्यासाठीच मी प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *