बारामती 25 :- कृषी विभागामार्फत मळद येथे 22 ऑक्टोबर 2021 रोजी असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योजकांना संघटित व प्रोत्साहित करण्याच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत हरभरा पीक “महिला किसान” दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शेती दिनामध्ये तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांधल यांनी हरभरा पिकाच्या पूर्व मशागतीपासून उगवण क्षमता तपासणी, वाण निवड, बीज प्रक्रिया, पेरणी, कीड व रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन, काढणी, मळणी व काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, साठवणूक, विक्री व्यवस्थापन व शेतीमाल प्रक्रिया,सेंद्रीय शेती, महिला सबळीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेती मालावर प्रक्रिया उद्योग, पोषण आहार, गीर गाय संगोपन व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग, याविषयी तज्ञ उद्येाजकांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *