प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) दौंड (आत्मा) आणि Farming Innovation Centre यांच्या संयुक्त विद्यमाने पाटस तालुका दौंड येथे जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार विजेते शेतकरी संदीप घोले यांनी कांदा पिकातील वाढत्या समस्या आणि कांदा बिजातील अशुद्धता यावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये कांदा बीज उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, निवड पद्धत, एक डोळा व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीजोत्पादन करताना करायची बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच सध्या कांदा पिकामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पातीला पीळ पडून रोपांची मर होत आहे या बाबत घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन देखील करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सध्या कांदा पिकातील पीळ पडणे व मर रोगाबाबत तालुक्यात मंडळ निहाय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सध्या कांदा या पिकांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत भेसळीचे प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी करून शुद्ध बियांची निर्मिती करण्यात यावी याविचाराने आत्मा अंतर्गत तालुक्यामध्ये करार शेती च्या माध्यमातून कांद्याचे बीज उत्पादन करावे असा विचार आला. त्याअनुषंगाने संदीप घोले यांच्या प्रचलित “संदीप प्याज” या वाणाचा प्रसार करणे बाबत नियोजन करण्यात येणार आहे असे यावेळी सांगितले. तालुका शेतकरी सल्ला समिति चे अध्यक्ष अरुणअण्णा भागवत, शेतीनिष्ठ शेतकरी धनंजय आटोळे, ॲग्रोवन चे पत्रकार संदीप नवले, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी राजेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी महेंद्र जगताप कृषी पर्यवेक्षक चिपाडे, कृषी सहाय्यक मोनिका दिवेकर, सुप्रिया झरकर, रेखा पिसाळ,अझहर सय्यद, प्रकाश लोणकर, राहुल लोणकर, अतुल होले, संदीप सरक, अंगद शिंदे, अमोल जगताप, दिगंबर मगर, पोपट मगर, सुनील धुमाळ,मंगेश फडके, सुदाम गुंड, संकेत निगडे, शेतकरी मित्र समाधान शिंदे, भिमराव दिवेकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द फार्म चे रितेश पोपळघट यांनी केले तर आभार माऊली कापसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *