प्रतिनिधी – बारामती औद्योगिक क्षेत्रातील आयएसएमटी लिमिटेड कंपनीतील आयएसएमटी कामगार संघटनेची सन 2021 ते 2024 साठी त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली. सदरच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार विजयी झालेले आहेत कल्याण कदम – अध्यक्ष, गुरुदेव सरोदे – जनरल सेक्रेटरी, शिवाजी खामगळ – उपाध्यक्ष, रवींद्र गिरिमकर – खजिनदार, संतोष साळवे – सदस्य, संजय सस्ते – सदस्य, सुनील पोंदकुले – सदस्य, रमेश लोखंडे – सदस्य, सुरेश दरेकर – सदस्य यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर कामगार बंधूंच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. सर्व कामगार बंधूंनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *