एक हजार झाडे लावण्याची मोहीम राबवली जाणार

प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 19 येथे मा अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. झाडे लावण्याची मोहीम राबवण्यासाठी नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी विशेष असे सहकार्य केले. माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांच्या प्रयत्नातून गुजर इस्टेट, जनहित प्रतिष्ठान शाळा, बारामती हॉस्पिटल परिसर मध्ये एक हजार झाडे लावण्याची मोहीम राबवली जाणार आहे. गुजर इस्टेट, जनहित प्रतिष्ठान शाळा, बारामती हॉस्पिटल परिसरामध्ये 590 झाडे लावण्यात आले. उर्वरित झाडे लावण्याची मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असलेले वृक्ष लागवडीची मोहीम प्रभाग 19 मध्ये राबवली जाणार आहे. त्याचसोबत लावलेल्या सर्व झाडांचे संगोपन केले जाणार आहे .परिसरामध्ये झाडे लावण्यासाठी जनहित प्रतिष्ठान शाळेचे किशोर कानिटकर, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याच्या मोहिमे मध्ये सहभागी होऊन सर्वपरिसरामध्ये झाडे लावली. कार्यक्रमासाठी सौ पौर्णिमाताई तावरे, नगराध्यक्षा बारामती नगरपरिषद. इम्तियाजभाई शिकलकर शहराध्यक्ष बारामती शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजू दादा देशपांडे, गणेश शिंदे, माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे, अभिजीत जाधव उपनगराध्यक्ष, सत्यव्रत काळे सभापती बांधकाम विभाग, निलेश मोरे उपाध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्ताफ सय्यद संचालक मुस्लिम बँक, नगरसेवक रमेशआप्पा भोकरे, अमर धुमाळ, अतुल बालगुडे, कुंदन लालबिगे, अजित कांबळे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, नगरसेविका अनिता जगताप, संगीता सातव, अश्विनी गालिंदे, कमल कोकरे, तसेच दीपक मलगुंडे, अनिल सावळे पाटील, पराग गुजर, भाविन गुजर, सोमनाथ आटोळे, विकी गायकवाड, अक्षय नेमाने व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी महेश रोकडे मुख्‍याधिकारी बारामती नगरपरिषद, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, बांधकाम विभागाचे संघपाल गायकवाड, उद्यान विभागाचे माजिद पठाण, जमाल शेख यांनी सहकार्य केले.
मा अजित पवार यांनी देशीवृक्ष व मोठ्या प्रमाणात सावली देतील व पक्षी सुद्धा विश्रांती घेतली अशा झाडाचे वृषारोपन करण्याची सूचना नगरपरिषद प्रशासनास यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *