प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , गुरुवार दिनांक 07 ऑक्टोबर 2021

स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे व सह अध्यक्ष शिवश्री अतुलदादा ढम यांच्या संकल्पनेतून वार सोमवार दिनांक ०४ / १० / २०२१ रोजी सुपे परगणा पानसरे वाडी या ठिकाणी घेण्यात आलेल्या लसीकरणा दरम्यान जागर शिवविचारांचा या संकल्पनेतून लसीकरणासाठी आलेल्या डॉक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवविचारांचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले .

याप्रसंगी डॉक्टर पृथ्वीराज यादव, योगीराज यादव, प्रशांत भोसले, अमोल चांदगुडे, प्रतिमा मोरे, सायली बनसोडे, व आशा वर्कर्स पानसरे वाडी च्या ज्योती पानसरे उपस्थित होते. याप्रसंगी यांना पुस्तके भेट देण्यात आली .

त्यावेळी पानसरे वाडी तील रणजित कोंडे, दत्तात्रय पानसरे, मयूर पानसरे, किरन धायगुडे, यांचे सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री अतुलदादा ढम यांनी केले व आभार प्रदर्शन शिवश्री निलेश पानसरे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *