प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी दौंड व मंडळ कृषी अधिकारी पाटस यांच्या वतीने स्वामी चिंचोली ता.दौंड येथे दिनांक 01/10/2021 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी बियाणे वाटप, शेतकरी प्रशिक्षण, बीज प्रक्रिया कार्यक्रम पर पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शन संजय कदम कृषी पर्यवेक्षक पाटस 2 यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.उपसरपंच प्रकाश होले, ग्रामपंचायत सदस्य जयराम नान्हाणे, शंकर कांबळे कृषी सहायक स्वामी चिंचोली उपस्थित होते.

या वेळी ज्वारी पिकासाठी बीज प्रक्रिया विषयी मार्गदर्शन शंकर कांबळे यांनी केले. त्यानंतर कदम साहेब यांनी ज्वारी पिका विषयी पेरणी ते काढणी पर्यंत साखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिका सोबत देण्यात येणाऱ्या निविष्ठा विषयी माहिती दिली. तसेच निवड झालेल्या 25 शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी माती नमुना कसा घ्यावयाचा या विषयी मार्गदर्शन केले व माती नमुने लवकरात लवकर जमा करण्यात सांगितले.

तसेच शेवटी शंकर कांबळे कृषी सहायक यांनी ज्वारी प्रकल्प कालावधीत राबविण्यात येणाऱ्या बाबी जसे माती परीक्षण, शेती दिन, तज्ञांचे मार्गदर्शन व शास्त्रज्ञ भेट हे उपक्रम राबविले जाणार आहेत, यांची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *