प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , शनिवार दिनांक 02 ऑक्टोबर 2021

देऊळगाव रसाळ येथे आज 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामपंचायत देऊळगाव रसाळ , नेहरू युवा केंद्र पुणे ( युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार ) व जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठाण देऊळगाव रसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात प्रतीमा पूजन केले. व नंतर स्मशानभूमी या ठिकाणी स्वछता करण्यात आली . व त्या ठिकानी 06 फुट उंचीच्या पिंपळाचे रोप लावण्यात आले

त्यावेळी जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष ह भ प संजय महाराज वाबळे सर , प्रविण खंडागळे व आनंद रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले .

त्यावेळी नेहरू युवा केंद्र बारामती तालुका समन्वयक वैभव भापकर , कुंभार सर , अनुज एंटरप्रायझेसचे संतोष रसाळ यांनी 100 मास्क चे वाटप केले व ई – श्रम कार्डची मोफत नोंदणी करून दिली .

त्यावेळी उपसरपंच दत्तात्रय वाबळे , ग्रामसेवक दिपक बोरावके , तलाठी गुळवे , पोलीस पाटील राधिका खोरे , ग्रामपंचायत सदस्या सुनंदा उदावंत , सल्लाउद्दीन इनामदार , राहुल लोंढे , ह भ प संजय महाराज वाबळे सर , मोरे सर , अंगणवाडी सेविका सौ. इनामदार सौ. वाबळे सौ. रसाळ ,सौ. काझी , सौ. थोरात , उमेश वाबळे , आनंद रसाळ , वसंत वाबळे , हनुमंत वाबळे , मिनीनाथ उदावंत , प्रकाश वाबळे , प्रवीण खंडागळे , विजय भिसे , प्रताप वाबळे , रामदास खोरे , दिपक वाबळे , दत्तात्रय वाबळे , बाळासाहेब वाबळे , नामदेव भिसे , भारत भिसे , ग्रामपंचायत ऑपरेटर संतोष रसाळ , पेटकर मामा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *